मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंचे नाव न घेता टोला : हा तर चंदूभाऊंचा मतदारसंघ

Allotment of accounts to ministers before session: Former minister Girish Mahajan मुक्ताईनगर  : हा मतदारसंघ कुणा भाऊंचा नसून हा चंदूभाऊंचा मतदारसंघ आहे, जे निवडून आले त्यांचा मतदारसंघ असतो, अशी उपरोधिक टीका कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आदिशक्ती मुक्ताबाईच्या दर्शनासाठी कोथळी येथे मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच आल्यावर केली. खाते वाटप करण्यासाठी तांत्रिक अडचणी आल्यामुळे उशीर नक्कीच झाला परंतु 17 पासून अधिवेशन असून त्यापूर्वीच खातेवाटप केले जाईल, तसेच मुक्ताबाई मंदिराचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी येत्या 30 तारखेच्या आत जिल्हाधिकार्‍यांसोबत अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परीषदेचे माजी सभापती जयपाल बोदडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जावरे, माजी नगराध्यक्ष नजमा तडवी, युवा मोर्चाचे पवन कोळी, महेश खेवलकर, के.डी.वंजारी, धनंजय सापधरे, शुभम तळेले, सचिन पाटील, विजय काठोके, पोलीस पाटील संजय चौधरी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुक्ताई संस्थानतर्फे ज्ञानेश्वर हरणे पाटील यांनी महाजन यांना आदिशक्ती मुक्ताबाईची प्रतिमा भेट दिली.