मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईविरोधात राष्ट्रवादी मैदानात

रावेरसह यावलमध्ये तहसील प्रशासनाला निवेदन ः यंत्रणेचा गैरवापरासह कारवाईचा पदाधिकार्‍यांकडून निषेध

रावेर/यावल : केंद्र शासनाकडून ‘ईडी’ व इतर शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करीत यावलमध्ये महाविकास आघाडीने यावलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदन दिले तर मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध नोंदवत रावेरात राष्ट्रवादी महिला पदाधिकारी मैदानात उतरल्या.

यावलमध्ये आघाडीचे प्रशासनाचे निवेदन
यावल :
शहरातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती या घटक पक्षाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवण्यात आला तर केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या वापराविषयी निषेध नोंदवण्यात आला. या शुक्रवारी संदर्भात यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे विशेषतः अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्या विरोधात बोलणार्‍या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करू पाहत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत लाजीरवाणी असून नवाब मलिक यांच्या अटकेचा आम्ही यावल तालुका महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करतो, असे निवेदनात नमूद आहे.

यांनी दिले निवेदन
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, प्रहारचे अभिमन्यू चौधरी यांनी केले. प्रसंगी देवकांत पाटील, जगदीश कवडीवाले, तालुकाप्रमुख रवी सोनवणे, फैजपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, नरेंद्र पाटील, भागवत आखाडे, विजय साळी, निवृत्ती, हाजी फारुक शेख युसुफ, आयुब खान, कबीर खान करीम खान, अनिल जाधव, अनिल जंजाळे, अमोल भिरूड, उज्वला महाजन, नईम शेख, पुंडलिक बारी, अरुण लोखंडे, सईद शेख, वसंत पाटील, सुनील जोशी, शेख जाकीर शेख हारून, मोहसीन खान, शेख रीयाज शेख साबीर, दिनू पाटील, कबीर खान, देवकांत पाटील, प्रतिभा निळ, द्वारका पाटील, अ‍ॅड.रीयान पटेल, शेख अशपाक शेख शौकत, जितेंद्र गजरे, किशोर माळी, वसंत पाटील, शेख सादिक शेख हमीद, शेख अन्वर हाजी, अभिमन्यू चौधरी, अशोक चौधरी आदींनी निवेदनात निषेध व्यक्त केला.

रावेरात मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईचा राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांकडून निषेध

रावेर : धरणगाव येथे बालिकेवर अत्याचार करणार्‍या आरोपीविरुद्ध कठोरात-कठोर शासन करावे तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीचा निषेध करीत रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी रावेर तहसीलदार प्रशासनाला निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष शकुंतला महाजन, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, शब्बीर शेख जिल्हा सरचिटणीस, माया बारी, लिना महाजन, बबिता तडवी, शुभांगी पाटील, सरला पाटील, कविता गोळसे, कुसूम तायडे, लिलाबाई मोरे, हसनूर तडवी, अर्चना पाटील, पांडुरंग पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.