मंत्री माध्यमिकची श्रध्दा लोहार कासोदा केंद्रात प्रथम

0

कासोदा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च 2017 च्या दहावीच्या परीक्षेत के.एन.मंत्री माध्यमिक विद्यालय कासोदा येथील विद्यार्थीनी श्रध्दा राजू लोहार ही कासोदा केंद्रातून प्रथम आली असून तिला 93.60 टक्के गुण मिळाले आहे. के.एन.मंत्री माध्यमिक विद्यालयाच्या निकाल 87.75 टक्के लागला असून शाळेतून व कासोदा केंद्रातून प्रथम श्रध्दाने प्रथम क्रमांक पटकविला आहे.

विद्यार्थींनीचे स्वागत
द्वितीय क्रमांक पुनम गोरख मराठे, तृतीय क्रमांक दामिनी दशरथ मराठे, चतुर्थ क्रमांकाने लक्ष्मी विलास पाटील उत्तीर्ण झाले आहे. शोभा मंत्री, व्ही.जी.पांडे, यु.टी.महाजन, पी.एस. पाटील, आर. व्ही. वाणी, के.ए. पाटील, एस.पी. बोरसे, एस.ए. साळुंखे, एस.के.पाटील, गोपाल पाटील, आर.पी.पाटील, व्ही. आर चौधरी यांचेसह पालकांनी व इतरांनी अभिनंदन केले.