थिरूवनंतपुरम :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरुर थिरूवनंतपुरम येथील एका मंदिरात पूजा करताना त्यांना जखम झाली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरुर यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या अंगावर रक्ताचे थेंबही पडले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे.
थंपानूर येथील गंधारी अमन कोवित मंदिरात शशी थरुर यांची तुला करण्यात येत होती. त्यावेळी थरुर हे एका तराजुत बसले होते, तर दुसऱ्या तराजुत काही साहित्य ठेवण्यात येत होते. त्यावेळी दुसऱ्या तराजुतील साहित्य कमी-अधिक झाल्याने थरुर यांचा तोल गेला. त्यामुळे त्यांना अपघात होऊन त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला 6 टाके पडले आहेत.