मंदीच्या सावटातही भारताची प्रगती सुखावणारी -दलजिंदर सिंग

0

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत कॅम्पस मुलखातीला सुरुवात

भुसावळ- जागतिक स्तरावर रोजगार व त्यावर आधारीत अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतांना सुद्धा भारतात गुंतवणूकदारांनी वेगळा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. मंदीच्या सावटातही भारताची प्रगती सुखावणारी आहे. यामुळे भारतात रोजगाराला पूरक अश्या क्षेत्रात गुंतवणुक करून उद्योग धंद्यांना मोठ्याप्रमाणात अभियंते उपलब्ध असणे ही मोठी जमेची बाजू ठरत असल्याचे मत बंग्लोर आयआय एचटी लिमिटेडचे संचालक दलजिंदर सिंग यांनी येथे केले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलाखत पूर्व मार्गदर्शनात ते बोलत होते. सिंग म्हणाले की, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राला तर भविष्यातील मोठी व्यावसायिक संधी यानिमित्ताने खुणावू लागली आहे. येत्या दहा-वीस वर्षातील व्यावसायिक संधी हेरण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांना लाखो अभियंत्यांची आवश्यकता आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.आर.बी.बारजिभे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलप्रमुख प्रा.आय.डी.पॉल, सहप्रमुख प्रा.आर.ए.अग्रवाल उपस्थित होते. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी खुल्या व्हाव्यात म्हणून उद्योगक्षेत्राच्या मदतीने महाविद्यालयात ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ मोहीम दरवर्षी हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात रराबवली जाते, असे प्रा.आय.डी.पॉल म्हणाले. इलेक्ट्रॉनिक्स अंड टेलिकॉम, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल शाखेच्या एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्रुप डिस्कशननंतर ऍप्टिटूड व टेक्निकल टेस्ट घेण्यात आली. यशस्वितेसाठी प्रा.धीरज पाटील, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.वाय.जी.परदेशी, प्रा.के.आर.चौधरी, प्रा.गौरव टेंभुर्णीकर, प्रा.किशोर पाटील यांनी परीश्रम घेतले.