मंदीच्या सावटामुळे खरेदी-विक्रीत घट

0

चाळीसगाव । मागील वर्षी अचानकपणे झालेली नोटबंदी आणि सरकारने जादा कराच्या स्वरूपात लादलेली जी.एस.टी.मुळे छोटे मोठे व्यापारीसह सामान्य नागरीक व शेतकरी देखील कमालीचा त्रस्त झाला असून यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील कमी णाले असून चाळीसगाव तालुक्यात या व्यवहारांमध्ये कमालीची घट झाली असून चाळीसगाव दुय्यम निंबधक कार्यालयात क्रमांक 1 व 2 मध्ये सन 201 ते 2016 च्या तुलनेत कमी प्रमाणात खरेदी विक्रीसह इतर व्यवहार नोंदले गेले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. मागील 3 वर्षात प्लॉट, जमीन, खरेदी विक्री यासह गहाणखत, हक्कसोड, वाटणीपत्र, मृत्यूपत्र, भाडेपट्टा, लिव्ह अ‍ॅण्ड लाईसन्ससह बक्षिसपत्राचे दस्त कमी जास्त फरकाने रेल्वे स्टेशन जवळील व पोलिस ग्राउंड शेजारील दुय्यम निबंधक कार्यालय क्र.1 मध्ये नोंदले गेले आहेत. त्यात सन 2015 मध्ये एकूण 6701 दस्तांपैकी खरेदीचे 4261, गाहणखत 1192, बक्षीसपत्र 49 व इतर नोंदल्या गेले आहेत. त्या तुलनेत 2016 मध्ये कमालीची घट येवून 4141 एकूण दस्त नोंदले गेले असून त्यात 2771 खरेदी, 667 गहाणखत तर 55 बक्षिसपत्र यासह उर्वरीत दस्त नोंदले गेले होते.

कर लागु झाल्याने व्यवहार बंद
एकंदरीत पाहता सन 2016 मध्ये अचानकपणे नोंटबंदी चा निर्णय झाल्याने त्यात अनेकांना आपला पैसा उजेडात आणून तो बँकांमध्ये भरावा लागत होता म्हणून कोणाकडे किती पैसा आहे. हे स्पष्ट झाल्यामुळे व्यवहारांवर व वस्तुंवर जी.एस.टी.च्या स्वरूपात कर लागू झाल्यामुळे त्यात अनेकजण अडचणीत येवून अनेकांचे व्यवहार ठप्प झाले व त्याचा परिणाम खरेदी विक्रीच्या व्यवहारावर होवून 2015-16 च्या तुलनेत 2017 मध्ये खरेदी विक्रीमध्ये कमालीची घट दिसून येत आहे.

बक्षिसपत्रात सवलत मिळाल्याने त्यात झाली वाढ
2016 मध्ये 3135 एकूण दस्तापैकी 1921 खरेदीचे दस्त व उर्वरीत इतर दस्तांची नोंदणी करण्यात आली होती तर जानेवारी 2017 पासून ते 15 डिसेंबर 2017 पर्यंत 2973 दस्तांची नोंदणी झाली असून त्यात खरेदीचे दस्त 1797 असून उर्वरीत इतर दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. दोनही कार्यालयातील 2015 च्या दस्त पाहता त्यात 7924 एकूण दस्त तर 5057 खरेदी झाल्या होत्या. त्या तुलनेत 2016 मध्ये 7276 एकूण दस्त नोंदणी झाली होती. त्यात 4692 इतक्या खरेदी झाल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये 6432 एकूण दस्त नोंदणी झाली होती. त्यात 4069 एकूण दस्तापैकी खरेदी करण्यात आली होती या आकड्यांची तफावत पाहीली असता सन 2015-2016 च्या तुलनेत 2017 मध्ये खरेदी व हक्कसोड, गहाणखत, वाटणीपत्र, मृत्यूपत्र, भाडेपट्टा व लिव्ह अ‍ॅण्ड लाईसन्स या दस्त नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. पण रक्ताच्या नात्यासाठी बक्षिसपत्रामध्ये सवलत मिळाल्याने त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

15 डिसेंबर अखेर 3459 दस्तांची नोंदणी
जानेवारी 2017 पासून ते 15 डिसेंबर 2017 पर्यंत त्या तुलनेत दस्त नोंदणीत घट होवून केवळ 3459 दस्तांची नोंदणी झाली असून त्यात 2015, 2016 च्या तुलनेत फक्त 2017 मध्ये फक्त 2272 खरेदी झाल्या असून 453 गहाणखत झाले आहेत व 2015 मध्ये बक्षिसपत्र 49 होते. 2016 मध्ये 55 परंतु यावर्षी शासनाच्या वतीने रक्ताच्या नात्यात बक्षिसपत्रासाठी 1 टक्का मुद्रांक शुल्क रक्कम आकारली जात असल्याने 2017 मध्ये बक्षिसपत्राचे 86 दस्त नोंदले गेले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन कार्यालयात सन 2015 मध्ये एकूण 1223 दस्त, 2015 मध्ये एकूण 1223 दस्त नोंदणी झाली होती. त्यात 796 खरेदी झाल्या होत्या व दस्त नोंदणी करण्यात आली होती.