मच्छीमार संघटनेचे उपोषणार्थी दुर्लक्षित ; प्रशासन बेदखल

0

मुक्ताईनगर– हतनुर धरण परीसरातील तापी व पूर्णा नदी क्षेत्रात गेल्या दोन वर्षापासून परप्रांतीय मच्छीमारांनी धुमाकूळ घातल्याच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघ अंतर्गत येणार्‍या स्थानिक मच्छीमारांनी तहसील कार्यालयासमोर 23 रोजी पासून साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु प्रशासनाने तीळमात्र दखल न आमरण उपोषण सुरू करण्यात आले. गुरुवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता.

अधिकार्‍यांकडून अंग काढण्याची भूमिका
परप्रांतीय मच्छीमारांनी धुमाकूळ घातल्याच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघातर्फे तालुक्यातील मासेमारांनी साखळी उपोषणानंतर पाचव्या दिवसापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. विविध खात्याच्या अधिका़र्‍यांनी आपल्या अंगावरची जबाबदारी झटकत मासेमारांना बेवारस सोडल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.