मतदानाच्या दिवशी दहशतवाद्यांना मारल म्हणून काही लोक नाराज; मोदींचा घणाघात

0

कुशीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी सभा घेत आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे त्यांनी आज प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली. आज सकाळी आपल्या जवानांनी काही दहशतवाद्यांना ठार केले आहे, यावर देखील काही लोकांना आपत्ती आहे. आज मतदानाच्या दिवशी जवानांनी दहशतवाद्यांना का मारल असे प्रश्न काही लोक करत असल्याचा टोला मोदींनी लगावला.

जर दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर जवानांना त्यांना प्रत्युत्तर देण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहे. दहशतवादी समोर बॉम्ब आणि बंदुके घेऊन उभे असतांना जवानांनी दहशतवाद्यांना मारायचे की नाही यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागावी का? असा प्रश्नही मोदींनी केला.