मतदान केंद्राची निवडणूक अधिकार्‍यांकडून तपासणी

0

खिर्डी । येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील मतदान केंद्राची तपासणी रावेर सार्वजनिक निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांसह निवडणुक पथकातील कर्मचार्‍यांनी तपासणी केली. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रातील स्वच्छतागृह, लाईट, विजेची व्यवस्था, रॅम्प, पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे मतदारांची तपासणी व बीएलओ दिलीप चौधरी यांच्याशी मतदान याद्याबाबत चर्चा केली. यांची होती उपस्थिती यावेळी मुख्याध्यापिका तिलोत्तमा वारके यांसह मतदार व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.