मतदारयाद्यांच्या कामात कुचराई करणार्‍या बीएलओंवर कारवाई होणार

0

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचा इशारा ; रावेरला आढावा बैठक

रावेर- रावेर व चिनावलच्या मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) यांनी मतदार याद्यांच्या दिरंगाई दाखवल्याने त्यांच्यावर कारवाई होणार असून मतदारांनीदेखील मतदार याद्यांमध्ये आपल्या नावाची शाहनिशा करून दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे. कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) मतदार केंद्रस्तरीय सहाय्यक (बीएलए) यांची मतदार याद्यांबाबत बैठक घेण्यात आली. तहसीलदार विजयकुमार ढगे यांची उपस्थिती होती.

मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या सूचना
बीएलओ यांनी गाव पातळीवरील मतदारांमध्ये मतदान दुरुस्ती संदर्भात प्रचार-प्रसार तसेच दिलेल्या वेळेत काम पूर्ण करावे, मतदारांच्या घरापर्यंत जावून नावांबाबत खात्री करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार याद्यांमधील नावांची दुरूस्ती करणे, मतदार यादीत नाव आहे मात्र फोटो नाही म्हणून कलर फोटो घेणे आदी विषयावर उपस्थितीत शिक्षक, ग्रामसेवक,तलाठी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी निवडणूक मतदार याद्यांच्या आढावा बैठकीकडे दुर्लक्ष केले. इतर ग्रामीण भागात नेमलेले बीएलओ यांनी दिलेले काम वेळेत पूर्ण केल्याने प्रांतधिकारी थोरबोले यांनी त्यांचे कौतुक केले.