प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह ; श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मतदार जनजागृती मंचची स्थापना
भुसावळ- लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरीकांचा मूलभूत अधिकार असून ज्यांचे वय अठरा पूर्ण झाले आहे, अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी मतदाराला केंद्रबिंदू मानत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, जळगाव तसेच तहसीलदार, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मतदार जनजागृती मंचची स्थापना करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले. मंचचे अध्यक्ष प्राचार्य सिंह असून प्रा. अनंत भिडे मंचचे नोडल अधिकारी आहे. तसेच प्रा.सचिन हरीमकर, प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.नितीन खंडारे, प्रा.गिरीश भोळे, प्रा.राम अग्रवाल सदस्य आहेत.
जनजागृतीसाठी रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धा
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने मतदाराला केंद्रबिंदू मानून महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान सुरू करण्यात आले असून मतदार नाव नोंदणी अभियानाला राष्ट्रीय कर्तव्य मानत महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक काम करतील, असे आश्वासन यावेळी संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी दिले. 21 जानेवारी रोजी मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.प्रत्येक सज्ञान व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. निकोप लोकशाहीत सुदृढ समाज घडविणारा प्रतिनिधी निवडून देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याकरिता मतदान हे निपक्ष व निर्भयपणे व्हायला हवे. येणार्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याने प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करुन घ्या. तसेच नवीन मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावा, असे संदेश विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून दिली. रांगोळी मध्ये प्रथम नेहा महाजन, द्वितीय निकिता पाटील तृतीय क्रमांक भाग्यश्री चौधरी तर प्रश्नमंजुषेत श्रीकृष्ण शिपलकर प्रथम तर सागर पाटील द्वितीय आणि कुणाल तायडे तृतीय आला.