रावेर । रावेर -यावल विधानसभा मतदार संघात मतदारांची ऑनलाइन नाव नोंदणीत करण्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्याचे निवडणूक आयोगातर्फे कळविले आहे. याबाबत वृत्त असे महाराष्ट्रभर वेग-वेगळ्या मतदार संघात मतदारांचे फॉर्म नंबर 6, 7, 8चे ईआरओ नेट पध्दतीने ऑनलाइन दुरुस्ती व नोंदणी यादया अपडेट करण्यात आले. त्यात रावेर, यावल विधानसभा मतदार संघात संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, यावलचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदशनाखाली निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार कविता देशमुख व वैभव पवार यांनी टीमर्वक राबवून काम पूर्ण करून यशस्विरित्या काम केले आहे.