मतदार नोंदणी मोहीम

0

हडपसर : मतदान प्रक्रियेतून पारदर्शकता आणि देश घडविण्याची ताकद मतदार राज्याकडे आहे. त्यामुळे ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे. अशा विद्यार्थ्यांना मतदानाकरिता आवाहन करून मतदार नोंदणी विषयीची माहिती निवडणूक नायब तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक अधिकारी हडपसर शाखेच्या वतीने मतदार नोंदणी मोहीम व जनजागृती या विषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रशांत करपे, विश्वनाथ लोहकरे, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, डॉ. प्रभंजन चव्हाण आदी उपस्थित होते.