रीपाइं आठवले गटात प्रवेश : ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची दिली जवाबदारी
भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खर्या मार्गावर सर्वांनी चालायला हवे. महामानवांनी लिहिलेली घटना देशाच्या विकासासाठी असून त्याला हात लावणार्यांना प्रसंगी त्यांची जागा दाखविण्यात येईल. समाजातील लोकांनी एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी एकजुटता दाखविण्याची आता गरज आहे. राजकारणासह समाजकारणाचीही आवश्यकता असून सक्षम असल्याने सर्वांना सहकार्य करण्यात येईल. खांद्याला खांदा लावून भुसावळ विधान सभेच्या आगामी निवडणुकीत रीपाइंचा आगामी आमदार मतभेद विसरुन निवडून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रिपाइं गवई गटाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी मंगळवारी रिपाइं आठवले गटात प्रवेश केला. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात मंगळवार, 28 रोजी दुपारी प्रवेशोत्सव सोहळा झाला. प्रसंगी सूर्यवंशी बोलत होते.
तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देणार
नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी म्हणाले की, अनेक वर्षांपासून चळवळीत काम करीत असून असंख्य संकटांना तोंड दिले आहे. तळागाळातील जनतेला व कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे तर प्रमुख अतिथी म्हणून खान्देश अध्यक्ष लक्ष्मण जाधव, सचिव रवींद्र तायडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात, जळगाव लोकसभाक्षेत्र अध्यक्ष आनंद खरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मतभेद विसरून ध्येयासाठी एकत्र या -रमेश मकासरे
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मकासरे म्हणाले की, रीपाइंला डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करायचे असून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ. प्रत्येक समाजातील कार्यकर्ते पक्षाशी जुळत असून सुर्यवंशीच्या पक्ष प्रवेशाने मजबूती येईल. मतभेद विसरुन ध्येयासाठी एकत्र यायची गरज आहे. शिस्तबद्ध आखणी, गाव तेथे शाखा स्थापन करून व्यापक स्वरुप द्यायचे आहे. सर्व समावेशक शक्ती उभारणार असल्याचेही मकासरे यांनी स्पष्ट केले. रवींदद्र खरात, आनंद खरात, यांनीही मार्गदर्शन केले.
नूतन पदाधिकार्यांचा सत्कार
या प्रसंगी नुतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे, रावेर लोकसभाक्षेत्र अध्यक्ष सुदाम सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते पक्षात प्रवेश देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन रविंद्रनाथ तायडे यांनी केले. कार्यक्रमास युवा जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे, शरद सोनवणे, प्रवीण शेलार, बाळू सोनवणे, सुनील अंभोरे, विश्वास खरात, अरुण गजरे, अनिल सोनवणे, रॉकी चाबुकस्वार, भगवान निरभवणे, पप्पू सुरडकर, सुधीर दांडवेकर, शांताराम देशमुख, विरु चंडाले, हबीब खान, जुम्मा शाह, किशोर सुर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, रोहित सुर्यवंशी आदी उपस्थित होते.