मतमोजणीमुळे जामनेरचा आठवडे बाजार शुक्रवारी

0
जळगाव : जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 12 एप्रिल  रोजी आहे.  जामनेरचा आठवडे बाजार हा गुरूवारी असतो. याचदिवशी  मतमोजणी असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. यासाठी गुरुवार,12 एप्रिल रोजी भरणारा आठवडे बाजार आता शुक्रवार, 13 एप्रिल रोजी भरविण्यात यावा., असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहेत.