मदर तेरेसा ह्या गुन्हेगार ; तस्लिमा नसरीन यांचा वादग्रस्त वक्तव्य

0

नवी दिल्ली-वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मदर तेरेसांवर टीका केली आहे. मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केला आहे. गुन्हेगार समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असतील म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला मूल विकले होते. पण काही दिवसांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीने विकलेले मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. १४ दिवसांचे हे मूल मिशनरी ऑफ चॅरिटीकडून घेताना या जोडप्याने १.२० लाख रुपये मोजले होते. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर या जोडप्याने रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

या सगळ्या प्रकारावर वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी टीका करत हे सगळे प्रकार या संस्थेत कायमच चालले आहेत असा आरोप केला. तसेच मदर तेरेसा सुरूवातीपासूनच अनेक अमानुष आणि बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी होत्या असेही त्यांनी म्हटले आहे.