मद्यधूंद अवस्थेत पत्नीचा दोरीने गळा आवळून खून

0

हतनूर गावातील घटना : वरणगाव पोलिसांकडून आरोपीला पतीला अटक

भुसावळ (गणेश वाघ)- तालुक्यातील हतनूर येथे पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. मनीषा योगेश कोळी (26) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून पती योगेश कोळी यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यधूंद अवस्थेत पत्नीचा केला खून
आरोपी योगेश व मनीषाचा सुमारे नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता तर लग्नापासून आरोपी पती पत्नीचा छळ करीत होता तर या दरम्यानच्या काळात त्याने पत्नीला अनेकदा मारझोडही केली होती तर दोन महिन्यांपूर्वीच त्याने जुनी कुरापत काढून पत्नीच्या डोळ्यावर मारहाण केल्याने तिला कमीदेखील दिसत असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपी पतीने मद्यधूंद अवस्थेत दोरीने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला व पहाटे घराबाहेर येऊन आई-वडिलांना पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. याबाबत पोलीस पाटलांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक सचिन सानप व सहकारी घटनास्थळी रवाना झाले मात्र मयत विवाहितेने फाशी घेतल्याचे कुठलेही व्रण व मृतदेह लटकला नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांना संशय बळावला. यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून जळगाव सामान्य रुग्णालयात मृत विवाहितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत विवाहितेच्या पश्‍चात मुलगा व मुलगी असा परीवार आहे. आरोपी पतीला सुरुवातीपासून दारूचे व्यसन असल्याचे सूत्रांनी सांगितले.