जळगाव: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसाचे प्रमाण वाढले आहे. वाळू उपसा करणाऱ्या वाहनामुळे जिल्ह्यात अनेक अपघात झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आज सोमवारी सकाळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाहनाला धडक दिली. या वाहनात डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील होत्या. या अपघातात डॉ.वर्षा पाटील आणि त्यांचे वाहन चालक सतीश उभाळे बालबाल बचावले आहेत. या धडकेत फोर्च्युनर गाडीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. नशिराबाद येथे हा अपघात झाला. नशिराबाद पोलिसांनी यांनी वाळूने भरलेल्या ढंम्परला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कार्यवाही करण्याबाबत महसूल विभागाला सूचना देण्यात आले आहे. एम.एच.०४ सी.पी.९३९८ हे ढंम्पर सुखदेव सपकाळे यांच्या नावावर आहे.