जळगाव। काशिनाथ गोबा पाटिल (वय-60) हे नेहमी प्रमाणे 8 रोजी सकाळी 9.30 वाजे दरम्यान मुसळी येथील आपल्या शेतात बैलगाडीने जात असतांना मधमाशांनी हल्ला केला यात त्यांच्या डोक्याला, पाठीला सर्वाधिक जखमा झाल्या असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
यासोबतच आव्हाणे येथील निर्मला शेख इंगळे वय-40 यांना देखील मधमाश्यांनी चावा घेतला असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.