मधापुरी येथील 30 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू
कुटुंबियांनी केला घातपाताचा आरोप : शवविच्छेदन अहवालाअंती कळणार मृत्यूचे नेमके कारण
A 30-year-old youth from Madhapuri was killed and the body thrown? मुक्ताईनगर : तालुक्यातील मधापुरी येथील 30 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसानी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. नितेश पवार (30) असे मयताचे नाव आहे. नितेशची पत्नी त्याच्याकडे राहत नसल्याने तो सध्या आपल्या आईसह वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याच्याकडे काही जण आल्याचे परीसरातील लोकांनी पाहिले होते. यानंतर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला असून त्याच्या अंगावर मारहाण केल्याच्या काही खुणा आढळून येत असल्याने नितेश पवार याचा घातपात करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
पोलिसांची धाव
पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येत असून यातच त्याचा घातपात झाला की नाही ? याबाबतची माहिती मिळणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी पंचनामा केला आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मयताची आई शिलाबाई पवार यांच्या खबरीनुसार सुरूवातीला मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे.