निगडी : जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, आयएमए पीसीबी आणि सुप्रिम क्लिनिक आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि.18) ‘वॉकेथॉन 2018’ चे आयोजन करण्यात आले. या वॉकेथॉनला 1500 नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथून रविवारी सकाळी साडेसहा वाजता वॉकेथॉनला फुगे सोडून सुरुवात झाली. यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, रोटरी डिस्ट्रीक्टचे मेडिकल चेअरमन डॉ. भुसारी, डॉ. महेश पाटील, मृदुला सांगगावकर, ड़ॉ. सुजय नाईक, भाग्यश्री पंडीत, पिंपरी रोटरी क्लबच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, डॉ. मानसी व विनायक हराळे, रवींद्र कदम आदी उपस्थित होते.
तीन किलोमीटर अंतराचा वॉकेथॉन होती. वॉकेथॉनमध्ये हजार पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग होता. वॉकेथॉनमध्ये सहभागी होणार्यांच्या रक्तातील साखरेची उपाशीपोटी आणि खाल्यानंतर तपासणी करण्यात आली. याशिवाय बीपी आणि डोळ्यांची तपासणी देखील केली. डॉ. विनायक व डॉ. मानसी हराळे हे नागरिकांना मधुमेहासंदर्भात माहिती दिली. तसेच त्यासंदर्भात प्रदर्शनदेखील आयोजित केले होते. रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, आयएमए व सुप्रीम क्लीनिक यांनी संयोजन केले.