भोपाळ- मध्यप्रदेशच्या १५ विधानसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात आमदार शपथ घेणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता सत्राला सुरुवात झाले आहे. मध्यप्रदेश विधानसभेत २३० सदस्य आहेत, त्यात कॉंग्रेसचे ११४, भाजपचे १०९ सदस्य आहेत.