मध्यप्रदेशातील तरुण गावठी कट्ट्यासह जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

In Yawal, the suspect carrying a gavathi katta is in the net of Jalgaon crime branch यावल : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडल्याने शहरात खळबळ उडाली. ही कारवाई यावल तालुक्यातील किनगाव-यावल रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता करण्यात आली. गोलूसिंग दिलीपसिंग भाटीया (28, सिगनूर, बेहरामपूरा, खरगोन, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला यावल शहरात गावठी कट्ट्यासह संशयीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळी किनगाव-यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दुचाकी (एम.पी.10 एन.जी.0940) वर संशयीत गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया येताच त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा कट्टा जप्त करण्यात आला तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे प्रमोद अरुण लाडवंजारी यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले करीत आहेत.