मध्यप्रदेश मंत्रिमंडळ निवड: अनुभवी आमदारांनाच मिळणार स्थान !

0

भोपाळ- मध्यप्रदेशमधील नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाबाबत नवीन बाब समोर आली आहे. कमलनाथ यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकलेल्या आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात अनुभवी लोकांनाच स्थान मिळणार हे निश्चित. कमलनाथ हे मंत्रीमंडळाची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर नावे निश्चित होणार आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ११४ आमदार निवडणून आले आहे. त्यातील ५५ आमदार असे आहेत जे पहिल्यांदाच निवडून आले आहे. मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसला पूर्ण बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी सपा, बसपाने मदत केली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देणार का? याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी तशी कोणतीही अट नसल्याचे सांगितले.