मध्यरात्री महिलेवर अत्याचार : पारोळा तालुक्यातील घटना

A 25-year-old woman was raped in Parola taluka while threatening to kill her children पारोळा : चिमुकल्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना शनिवार, 10 रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे पीडीतेच्या कुटुंबातील लोक याबाबत जाब विचारण्यास गेल्यानंतर त्यांच्याविरोधातच पारोळा पोलिसात आरोपीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे. अत्याचार प्रकरणी सुरेश भिकन पवार या संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलांना ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
25 वर्षीय पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार, 10 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्या मुलांसह घरात झोपल्या असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास कुणीतरी अंगाला स्पर्श करत असल्यामुळे पीडीतेला जाग आली. त्यावेळी आरोपी सुरेश पवार याने पीडीतेचे तोंड दाबून तुझ्यासह मुलांनाही मारून टाकेल, अशी धमीकी देत जबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडीतेने ही घटना चुलत दिरासह अन्य नातेवाईकांना सांगितल्यानंतर संशयीत सुरेशच्या घरी दुसर्‍या दिवशी जाब विचारायला गेल्यानंतर संशयीताचे वडिल वडील भिकन हरचंद पवार याने त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याबाबत खोटी तक्रार दाखल केली.

नातेवाईकांनी दिली हिंमत
अत्याचाराबाबत पीडीतेच्या नातेवाईकांनी तिला हिंमत दिल्यानंतर पीडीतेने मंगळवारी पोलिसात धाव घेत सुरेशविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.