नवी दिल्ली- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी का होऊ शकली नाही याचे कारण स्वत:अखिलेश यादव यांनी सांगितले आहे. अखिलेश यादव यांनी याबाबत कॉंग्रेसला जबाबदार ठरविले आहे. कॉंग्रेस बसपाला या आघाडीत घेण्यास तयार नव्हते असे आरोप केले आहे. मी कॉंग्रेसला सांगितले होते की मध्य प्रदेशची निवडणूक महत्वाची असून त्यासाठी बसपाला सोबत घेणे आवश्यक आहे. निवडणूक जिंकण्यासाठी बसपाला सोबत घेणे गरजेचे असल्याची कल्पना मी कॉंग्रेसला दिली होती. मात्र कॉंग्रेसने त्यासाठी तयारी दर्शविली नाही असे आरोप सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे.
मध्य प्रदेशमध्ये कॉग्रेस, सपा, बसपा, जीजीपी या पक्षात आघाडी झाली असती तर २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या असेही अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.