रावेर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश पाल येथील सेरीनाकावर निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर वाहनांची कसुन चौकशी सुरु आहे. मध्य प्रदेशात पुढच्या आठवड्यात विधानसभा निवडणूक असून सीमेलगत भागात वाहनांची तपासणी सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त महाराष्ट्र-मध्य प्रदेश पाल (ता. रावेर) येथील सेरी नाक्यावर तैनात करण्यात आला आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सुध्दा असुन सीसीटीव्ही, मध्य प्रदेश पोलिस, महाराष्ट्र एसआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात अवजड ओवरलोड वाहनांची अवैध वाहतूक सुरू आहे. हजारो गुरे दरोरोज याच मार्गावरुन महाराष्ट्रत येत असल्याचे पाल येथील काही प्रत्यक्षदर्शी सांगतात.