भुसावळ । मध्य रेल्वेच्या मंडळ खेळकुद संघटनेतर्फे उन्हाळी क्रिडा शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन मंडळ रेल्वे प्रबंधक आर.के.यादव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक अरुण धार्मिक, मंडळ क्रिडा अधिकारी विजय कदम यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबीराच्या माध्यमातून आलेल्या खेळाडूंना पायाभूत प्रशिक्षण देयात येईल यातून खेळाडू शारिरीक तथा मानसिकरित्या स्वस्थ राहतील आणि आपल्या खाजगी जिवनात तंदरुस्त राहतील.
खेळांचा समावेश
हे शिबीर रेल्वे कर्मचार्यांच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या मुलांना क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॉक्सींग, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स अशा विविध क्रिडा प्रकारांचा समावेश आहे. यातून अनुभवी खेळाडूंकडून प्रशिक्षण दिले जाते. या शिबीरात 165 मुलांनी सहभाग घेतला.