मध्य रेल्वेच्या नाटय महोत्सवात ‘सृष्टी’ नाटकाला प्रथम क्रमांक

0

नाट्य महोत्सवाचा समारोप ; ‘देवघर के सामने’ द्वितीय तर तृतीयस्थानी ‘मुर्गीवाला’

भुसावळ- मध्य रेल्वेच्या ‘दृष्टी’ या नाटकाला मिळाले तर पूर्वोत्तर सीमा रेल्वेने (निर्माण) सादर केलेल्या ‘देवघर के सामने’ या नाटकाला द्वितीय तसेच तिसर्‍या क्रमांकाचे पारीतोषिक दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने सादर केलेल्या ‘मुर्गीवाला’ या नाटकाला मिळाले. तीन दिवसीय अखिल रेल्वे नाट्य महोत्सवाचा मंगळवारी क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत समारोप झाला. या महोत्सवाचे यजमानपद यंदा मध्य रेल्वेकडे होते.

यांची समारोपास उपस्थिती
समारोपाच्या कार्यक्रमास एडीआरएम मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाच्या राजभाषा विभागाचे निदेशक के.पी.सत्यानंदन, उपनिदेशक नीरू पटनी, सहायक निदेशक मीना चावला, मुख्यालयाचे उप महाप्रबंधक विपीन पवार, एडीआरएम मनोज सिन्हा, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप हिरडे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक अग्रवाल यांनी सांगितले की, भुसावळात आधुनिक साऊंड सिस्टम, आधुनिक लाईटींग, वातानुकूलित हॉलची गरज आहे. त्या हॉलमध्ये आधुनिक उपकरणांसोबत, योग्य प्रकाशव्यवस्था असल्यास नाट्यमहोत्सवासारख्या कार्यक्रमांची रंगत आणखी वाढेल. सूत्रसंचालन राकेश भावसार यांनी केले. देशभरातील विविध विभागांमधून आलेले नाट्यकर्मी प्रसंगी उपस्थित होते.

प्रेरणा पुरस्काराचे वितरण
पूर्वोत्तर रेल्वेच्या टीमने सादर केलेले ’मैमूद’, फिरोजपूर मंडळाचे ’नारी’, चित्तरंजन रेल्वे इंजीन कारखान्याचे ’जनक’, पश्चिम रेल्वेने सादर केलेले ’नमक का दरोगा’ आणि डीझेल रेल्वे इंजीन आधुनिकीकरण कारखाना पटियालाने सादर केलेले ’आषाढ का एक दिन’ या नाटकांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.