मनपाचा 20 हजार झाडे लावण्याचा मानस

0

धुळे । राज्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार्‍या वृक्षलागवड मोहिमेत धुळे महापालिकेला 8 हजार 500 झाडे लावण्याचे उद्दिष्ट असताना मनपाने चक्क 20 हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून तशी मागणी वनविभागाकडे नोंदविली आह़े शहरात राबविल्या जाणा:या वृक्षलागवड मोहिमेच्या पाश्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नुकतीच बैठक घेतली़ या बैठकीत प्रत्येक स्वच्छता निरीक्षक आणि ओव्हरसियर यांना शहरातील मोकळया जागांचे स्थळसव्रेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून 20 तारखेर्पयत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. शहरात वृक्षलागवड करण्यासाठी मनपाने शनिवारी वनविभागाकडे 20 हजार रोपांची मागणी नोंदविली़ सहायक आयुक्त शांताराम गोसावी व अभियंता कैलास शिंदे यांनी वनविभागाच्या अधिका:यांची भेट घेतली़ गेल्या वर्षी मागणीपेक्षा कमी रोपे उपलब्ध झाल्यामुळे खोदून ठेवलेले खड्डे बुजविण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती़ त्यामुळे मनपा प्रशासनावर टीका झाली होती़

रोपे खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार
शहरात 35 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात 600 झाडे लावावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले असून त्यासाठी नगरसेवक, शाळा, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आह़े तसेच प्रत्येक वृक्षाचे जीपीएसद्वारे छायाचित्र घेण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत़ यंदा मनपाला 8 हजार 500 वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट असतांनाही आयुक्तांच्या आदेशानुसार तब्बल 20 हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मनपाने हाती घेतला आह़े तत्पूर्वी या कामासाठी जेसीबी, टिकम, पावडी व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून रोपे खरेदी, वाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आह़े. शहरात वृक्षलागवड करण्यासह त्यांच्या संगोपनावर देखील भर द्यावा लागणार आह़े त्यामुळे ज्या भागातील मोकळया जागांवर किंवा रस्त्यांलगत झाडे लावली जातील, त्याठिकाणी वृक्षमित्र नेमून तसेच नागरिकांवर त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.असल्याचे मनपा सुत्रांकडून सांगण्यात आल़े