मनपाच्या कर्जाचा वाद; मुख्यमंत्र्यांचे नायडूंना पत्र

0

जळगाव। हुडको कर्ज प्रकरणी 31 मे रोजी मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), नगरविकासचे प्रधानसचिव यांना महापालिका आयुक्त जीवन सोनवणे माहिती देणार आहेत. तसेच यासंदर्भांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून महापालिकेच्या हुडकोचे कर्ज वन टाईम सेटलमेंट करण्याची विनंती केली आहे.

आतापर्यंत 291 कोटी दिले
यात त्यांनी हुडकोने घरकुल योजनेसाठी तात्कालीन नगरपालिकेस 141.38 करोड रूपयांचे कर्ज दिले होते. या कर्जांची परतफेड करण्यात महापालिका असमर्थ ठरल्याने 31 मार्च 2004 रोजी कर्ज पुर्नस्थापीत करण्यात आले होते. परंतु, महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महापालिका कर्ज फेडू शकलेली नाही. आतापर्यंत महापालिकेने 291.21 करोड रूपयांची परतफेड केली आहे. सप्टेंबर 2014 ते एप्रिल 2017 पर्यंतच्या प्रत्येक महिन्याल 3 कोटी रूपयांचा हप्त्यांचा समावेश आहे. हुडकोच्या कर्जांची परतफेड करणे महापालिकेला जड जात असल्याने वन टाईम सेटलमेंट करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांना केली आहे.