जळगाव । महापालिकेकडून हुडकोला दर महिन्याला 3 कोटी 75 लाख रुपयांचा दिला जाणारा हप्ता स्थगितीसाठी मनपाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्यशासन, मनपा व हुडको यांनी एकत्रित बैठक घेवून यावर 4 मे पूर्वी तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर शासनाने मनपाला पत्र पाठवून बैठक घेण्यास नकार दर्शवून शासनार्फत यापूर्वीच कार्यवाही सुरू केली असून वस्तुस्थितीची माहिती असलेले पत्र दिले आहे. डीआरटीने मनपाला 340 कोटी 74 लाखांची डिक्री नोटीस बजावली आहे. याबाबत मनपाने हुडकोला आतापर्यंत भरलेल्या हप्त्यांची सीए अनिल शहा यांच्यामार्फत पडताळणी केली आहे. 4 ऑक्टोंबर 2015 मध्येच हुडकोला व्याजासकट रक्कम भरली गेली दिसून येत आहे. मनपाने 40 कोटी अतिरिक्त रक्कम भरल्याचे दिसून येत आहे. परंतू डीआरएटी, डीआरटी मधे हुडकोने अद्याप हप्तांची माहिती दिलेली नाही. उच्च न्यायालयात याचिकेवर 4 मे ला सुनावणी होणार आहे.