मनपास्तरीय स्पर्धेत 200 खेळाडूंचा सहभाग

0

जळगाव। मनपा असोसिएशन व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन स्पोटर्स अ‍ॅकेडमी पुरस्कृत 14,17 व 19 वयोगटातील मुले व मुलींच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 14 वर्षे वयोगटात 80, 17 वर्षे वयोगटात 100 तर 19 वर्षे वयोगटात 40 अशा सुमारे 220 खेळाडूंच समावेश नोंदविण्यात आला. प्रत्येक गटातील 6 मुले व 6 मुलींची एकूण 36 खेळाडूंची निवड विभागीय पातळीसाठी झाली असून हे नासिक येथील पुढील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत यांची झाली विभागीय निवड; रेफरींची सुयोग्य पंचगीरी
स्पर्धेतील निवड झालेले खेळाडू 14 वर्षे वयोगटातील मुली- खुशी पाटील (अनुभूती), आदिती ओसवाल (रुस्तमजी), रिना मगरे (अनुभूती), रिया पाटील (नंदीनीबाई), सानिया खाटीक, अनजुम बानो (मनपा शाळा 11), मुले- यश शर्मा (सेंट लॉरेन्स), सुमित भोये, तेजस चौधरी, गौरव सोनवणे (अनुभूती), अम्मार खान (मिल्लत), इरफान खान (मनपा शाळा 35), 17 वर्षे वयोगट मुली- अन्सारी बुशरा (इकरा शाहीन), ईश्‍वरी अत्तरदे (नंदीनीबाई), शेख नुरुलरोन (इकरा शाहीन), बुशरा सय्यद (अलफैज), आस्था ओसवाल (रुस्तमजी), पाशा मुस्कान (ईकरा शाहीन), मुले- शेख मुजफ्फर, मोहम्मद उजैब, खान नोमान (मिल्लत), अक्षय राठोड (शारदा माध्य.), शेख दानिश (मिल्लत), अर्शद मोहम्मद (अ‍ॅग्लो ऊर्दू) 19 वर्षाखालील गट मुली- शेख तुवा, खान आयेशा, शेख आफरीन (इकरा शाहीन), मनिषा सुरगडे (बेंडाळे महाविद्यालय), होमिका अत्तरदे (नंदीनीबाई), हर्षदा बिर्‍हाडे (बेंडाळे महाविद्यालय), मुले- खान आजम (ईकरा शाहीन), विजय चौधरी (बाहेती कॉलेज), शेख जाहिद (मिल्लत हायस्कूल), शेख रईस (अ‍ॅग्लो ज्यु. कॉलेज), अरबाज खान (अ‍ॅग्लो ज्यु.कॉलेज), शेख मुजाहिद (मिल्लत हायस्कूल) स्पर्धा यशस्वीतेसाठी चिफ रेफरी सैय्यद मोहसीन, सहाय्यक योगेश धोंगळे, महम्मद साजिद, शेख वसिम, नईम अन्सारी, सैय्यद जुबेर, महम्मद फैजल यांनी पंच म्हणून कार्य केले. सुत्रसंचालन सैय्यद मोहसीन तर आभार एम.एम.पाटील यांनी मानले. मनपास्तरीय कॅरम स्पर्धेत गरीब होतकरु कुटूंबातील मुला-मुलींनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.