मनपा आयुक्त, जि.प. सीईओ आता इन्सीडेंट कमांडर

0

जळगाव – शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची इन्सीडेंट अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचे वर्गीकरण जिल्हास्तरीय रचना करण्यासाठी इन्सीडेंट कमांडरची नियुक्ती करण्यात आली आहे. यात महापालिकेचे आयुक्त सतीश कुळकर्णी यांची महापालिका कार्यक्षेत्रासाठी इन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महापालिका क्षेत्र वगळुन उर्वरीत नगरपालिका, नगरपंचायत जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती केली आहे. यात कोव्हीडे केअर सेंटरसाठी एका अधिकार्‍याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी देखिल स्वतंत्र नोडल अधिकारी नेमायचा आहे. इन्सीडेंट कमांडर यांनी केलेल्या सुचना व आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांविरूध्द कारवाई करण्याचा अधिकार संबंधित कमांडरला प्रदान करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.