जळगाव– मनपा उपायुक्त अजित मुठे यांची मीरा- भाईंदर महानगर पालिका बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन असतानाही उपायुक्त अजित मुठेंची झालेली बदली चर्चेचा विषय ठरत आहे. उपायुक्त मुठे यांनी कमी कालावधीत अतिक्रमण निर्मूलनाचे चांगले काम केले आहे. पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर त्यांनी कारवाईची मोहीम सुरू केली होती. मात्र लॉकडाऊन ही मोहीम थांबली आहे.