जळगाव । शहरातील नवीन जोशी कॉलनीतील संतोष दिलीप जोशी (वय-38) हे डीयुटीला जात असल्याने सांगून 10 रोजी घरातून गेले परंतु अद्याप पर्यंत देखील घरी न आल्यामुळे एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महानगरपालिकेत बांधकाम विभागातील कर्मचारी संतोष जोशी हे दि. 10 रोजी सकाळी 9.30 वाजता कामावर जातो असे सांगून घरातून गेले. परंतु आज पर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचा नातेवाईकांसह मित्र मंडळींकडे शोध घेण्यात आला. मात्र तरी देखील ते मिळून न आल्यामुळे त्यांची पत्नी ज्योती संतोष जोशी यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संजय भोई हे करीत आहे.