जळगाव । अतिक्रमण मोहिम राबवित असताना मनपा अतिक्रमण कर्मचार्यास दोन विक्रेत्यांकडून धक्काबुक्की होवून शिवीगाळ करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी 4.45 वाजेच्या सुमारास सुभाष चौक परिसरातील तिजोरी गल्लीत घडली. याप्रकरणी दोन्ही विक्रेत्यांविरूध्द अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा अतिक्रमण कर्मचारी सलमान युनूस भिस्ती (वय-23, रा.पिंप्राळा) हा इतर कर्मचार्यांसह सुभाष चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवित होता. त्याचवेळी सुभाष चौक परिसरातील तिजोरी गल्लीतील विके्रत्यांच्या हातगाड्या हटवित असताना अतिक्रमण करणार्या राजू सुकलाल भोई या विक्रेत्याचा वजनकाटा जप्त केल्याचा राग येवून त्याने सलमान यास धक्काबुक्की केली. याचवेळी जगदीश सुकलाल भोई याने देखील सलमान यास धुक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यामुळे त्याठिकाणी चांगलाच गोंधळ निर्माण झाली होता.