मनपा चषक फुटबॉल स्पर्धेस प्रतिसाद

0

जळगाव। येणार्‍या वर्षअखेर जळगाव शहरात महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन मनपा जळगाव ही जळगाव जिल्हा फुटबॉल असो.च्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात करेल अशी घोषणा महापौर नितीन लढ्ढा यांनी शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केली.

त्यावेळी स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडसे, विरोधी पक्षनेता वामनराव खडके, उपायुक्त लक्ष्मकांत कहार, फुटबॉल असो. उपाध्यक्ष नित्यानंद पाटील सचिव फारुक शेख उपस्थित होते. वर्षा खडकेंनी मनपा शाळांबद्दल खंत व्यक्त केली. फारुख शेख यांनी दर्जेदार स्पर्धा घेण्याचे घोषीत केले. सूत्रसंचालन चौबे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विवेक आळवणी तर आभार क्रीडा अधिकारी किरण जावळे यांनी मानले.