जळगाव – जळगाव महापालिकेची 2018 ची 19 प्रभागासाठी सार्वत्रिक निवडणुकीत 303 उमेदवारांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च हा ऑनलाईन भरणे बंधनकारक होते. त्यानुसार 303 उमेदवारांचे 1 कोटी 70 लाख 63 हजार 33 रुपये खर्चाची नोंद “ट्रू-वोटर’ ॲप्सवर झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज भरल्यापासुन ते निकालापर्यंत दैनंदिन खर्च हा ऑनलाईन भरण्याचे बंधनकारक हे “ट्रू-वोटर’ ॲप्सवर केले होते. प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 5 लाखाची निश्चित करण्यात आली होती. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्यानुसार सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च ऑनलाईन सादर केला. केवळ दोन उमेदवारांची स्वाक्षरी राहिली असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर निवडणुकीत माघारी घेतलेल्या 124 उमेदवारांचा खर्च 6 लाख 54 हजार 841 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.