पुणे-पीएमपीएमएलने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा-बंडगार्डन रस्त्यावर घडली. दरम्यान अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळ आणि पीएमपीएमएलच्या १२ गाड्यांवर दगडफेक केली. शहाबाज इसाक बागवान (वय-27) असे अपघात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.