मनमाड-नांदगाव दरम्यान इंजिनिअरींग व ओएचई ब्लॉक

0

9 व 10 रोजी रेल्वे प्रवाशांची गैरसोय : पाच गाड्यांना उशिराने धावणार

भुसावळ- मनमाड ते नांदगाव दरम्यान इंजिनिअरींग व ओएचई ब्लॉकच्या कारणामुळे 9 व 10 ऑक्टोबर रोजी भुसावळ विभागातून धावणार्‍या पाच गाड्यांना विविध स्थानकावर थांबवण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. 51154 अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाडीला पानेवाडी स्थानकावर सकाळी 11.50 ते तीन वाजेपर्यंत दरम्यान तीन तास 10 मिनिटे थांबवण्यात येणार आहे. अप 15018 गोरखपूर-एलटीटी काशी एक्स्प्रेसला हिसवळ रेल्वे स्थानकावर दुपारी एक ते तीन दरम्यान दोन तास थांबवण्यात येईल तसेच 12335 भागलपूर-एलटीटी सुपरफास्ट गाडीला नांदगाव रेल्वे स्थानकावर दुपारी 2.05 ते दुपारी तीन वाजेपर्यंत 55 मिनिटे थांबवण्यात येणार असून 12533 अप लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसला नांदगाव रेल्वे स्थानकावर दुपारी 2.15 ते तीन वाजेपर्यंत 45 मिनिटे थांबा देण्यात येणार आहे. मनमाड ते नांदगाव सेक्शन दरम्यान सलग दोन दिवस या गाड्या थांबवण्यात येणार असून रेल्वे प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.