मनमाड येथे रेल्वे मालगाडीचे 4 डबे घसरले

0

भुसावळ । मनमाड रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरल्याचा प्रकार मंगळवार 25 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसात पुन्हा दुसर्यांदा मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेबाबत प्रवाशांमध्ये प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनमाड येथे मालगाडी घसरण्याचे प्रकार थांबता थांबत नाहीयेत. रविवार 23 रोजी मालगाडीचे डबे ज्या ठिकाणी घसरले होते पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मालगाडीचे 4 डबे रुळावरून घसरल्याने मुबई-भुसावळकडे जाणार्या वाहतूकिवर परिणाम झाला आहे. गेल्या दोन दिवसात सलग दुसर्यांदा मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यामुळे अखेर रेल्वेत चाललय तरी काय असा प्रश्न प्रवाशासोबत सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.

रविवारी मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वरून ही मालगाडी जात असताना इंजिनपासून 29 वा डबा रुळावरुन घसरला होता. अपघातामुळे मुंबईकडे जाणार्या रेल्वे वाहतूकीवर परिणाम दिसून आला. गेल्या 10 दिवसांत मनमाड रेल्वे स्थानकाजवळची ही तिसरी घटना आहे. घसरलेले डबे रुळावरून हटविण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे.