शहादा । तालुक्यातील शेल्टी येथील ग्रामसेवक एम. व्ही. मंडळे ग्रामस्थांना विकास योजनाची महिती देत नाहीत,तसेच गावात न येता नेहमी दांड्यामारुन गैरहजर राहतात अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. सरपंच कमलाबाई ठाकरेंसह ग्रामस्थांनी प.स सभापती दरबारसिंग पवार यांची भेट घेऊन ग्रामसेवक मंडळे विरूध्द लेखी तक्रार दिली यापुर्वी बिडीओ यांच्याकडे दिली आहे. तक्रारी अर्जात म्हटल्याप्रमाणे शेल्टी ता शहादा येथील ग्रामसेवक एस. व्ही. मंडले हे गेल्या 12 वर्षापासून ह्याच गावात कार्यरत आहेत. ग्रामसेवक कार्यालयात ते नियमित हजर रहात नाही. तसेच गावातील कामे अथवा जिल्हा परिषद , पंचायत समिती कार्यालयाकडून आलेल्या योजना व निधीबाबत कुठल्याही प्रकारची माहिती पुरवित नाही तथा विचारणा केल्यास अरे रावीची भाषा करतात. याबाबत या अगोदर गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. परंतु त्याची आजपर्यंत दखल घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही
तक्रारी अर्जात ग्रामसेवक कुठल्याच प्रकारचे सहकार्य व माहिती देत नसल्याने शेल्टी या गावाचा विकास खुंटला असल्याचा स्पष्ट करण्यात आले आहे. तरी अश्या उर्मट व मनमानी करणार्या ग्रामसेवकाची सखोल चौकशी करुन त्यांचावर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे म्हटले आहे . सरपंचानी स्वतः आज ग्रामस्थासोबत पंचायत समिती सभापती दरबारसिंग पावरा यांना भेटुन ही सर्व माहिती दिली. सभापतींनी भ्रमणध्वनी लावल्यावर त्यांना देखील त्यानी उडवा उडवीचे उत्तर दिल्याचे समजते. मी बाहेर गावी मौतीत आलो आहे सोमवारी भेटेन असे भ्रमणध्वनीवर कळविल्याची माहिती मिळाली. सभापती दरबारसिंग पावरा यांना भेटण्यासाठी सरपंच कमलाबाई अर्जुन ठाकरे सह राजेसिंग भिल , आशाबाइ भिल , भाईदास भिल , वासुदेव भिल , राजु दामु भिल , विकास मोरे सतीश भिल , लिलाबाई भिल , रविंद्र काळु भिल , कलीबा भिल आदि ग्रामस्थ उपस्थित होते.