मनसेचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

0

शुध्द पाणीपुरवठा न झाल्यास नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा

शिरूर : शिरूर शहराला नगरपरिषदेच्यावतीने अशुध्द पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्य धोक्यात आले असुन याबाबत नगरपरिषदेने गंभीर दखल घेऊन शुध्द पाणी पुरवठा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला असुन तसे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, मनविसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे,प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे,मनसेचे सचिव आदित्य मैड,मनविसेचे उपाध्यक्ष प्रविण तुबाकी,माजी शहराध्यक्ष संदिप कडेकर,भाजपचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,शैलेश जाधव,प्रसन्न भोसले,रविंद्र गुळादे,कय्युम शेख,चेतन तुबाकी,अनिकेत घोगरे,विनायक तुबाकी,किरण जंगम,काळु भालेराव,विकास साबळे,हर्षद ओस्तवाल,डॉ.वैशाली साखरे,ताराआक्का पठारे,शारदा भुजबळ,बंटी घोगरे आदि उपस्थित होते.

नागरीकांना आरोग्याच्या समस्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिरूर शहराला नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या बर्‍याच दिवसांपासुन अशुध्द होत असुन पाणी पुरवठा ठेकेदार नविन असल्याने शुध्दीकरणास वेळ लागत असल्याने पाण्याच्या अशुध्दतेचे प्रमाण वाढले आहे ही दुदैवाची बाब आहे.अशुध्द पाण्याच्या पाण्यामुळे नागरीकांना पोटाच्या विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे सदर बाबीची नगरपरिषदेने गंभीर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषदेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा निवेदन देऊन देण्यात आला आहे.