मनिषा कोईरालाने जीवनकथा केली शब्दबद्ध!

0

नवी दिल्ली-नुकताच प्रदर्शित होऊन चांगली कमाई केलेल्या अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटामध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांची भूमिका करणाऱ्या मनिषा कोईरालाच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. कर्करोगाशी झुंज दिलेल्या मनिषाने आपली जीवनकथा शब्दबद्ध करायचे ठरवले होते. त्यानुसार तिने तिची ही कथा पुस्तक स्वरुपात चाहत्यांच्या भेटीला आणले आहे.

मनिषाने कर्करोगावर केलेली मात, तिचा संघर्ष याविषयीच्या तिच्या भावना पुस्तकातून व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकाचं नाव ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरीज’ असे असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या पुस्तकाची पहिली झलक दाखविली आहे.

‘पेंग्विन इंडिया आणि गुरवीन चढ्ढा आपल्या दोघांचे त्यांनी आभार मानले आहे. माझ्या जीवन प्रवास उलगडण्यासाठी मला प्रोत्साहित केल्यामुळे धन्यवाद. माझं पहिलं पुस्तक. आशा आहे हे पुस्तक साऱ्यांच्या पसंतीत उतरेल आणि नक्कीच माझ्या या संघर्षातून लोक चांगली प्रेरणा घेतली’, असे मनिषाने सांगितले आहे. मनिषाला कर्करोग झाल्याचे २०१२ साली निदान झाले होते. याचवेळी तिने आपला हा अनुभव पुस्तक रुपात मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने या पुस्तकातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.