मनुर बु.॥ येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बोदवड : तालुक्यातील मनुर बु.॥ येथील रवींद्र ओंकार वाणी (28) या तरुणाने शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली.

बोदवड पोलिसात नोंद
वाणी यांनी शेतात कुठल्यातरी कारणावरून गळफास घेतल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी अत्यवस्थ अवस्थेत त्यांना बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी सुभाष सीताराम देवरकर यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक तुषार इंगळे करीत आहेत.