जळगाव : मनुष्याची जशी दृष्टी असते, तसच त्याला जग दिसत असते. आपली दृष्टी, आपले विचार जर सकारात्मक असतील तर जीवन नक्कीच यशस्वी होईल ; माणसाला माणूस म्हणून जगवा, देव इतरत्र नसून माणसातच आहे, माणसामध्येच नारायण आणि स्त्रीमध्ये देवी नारायणी अर्थात पराशक्ती आहे आज आपण ‘मी’ च्या कीर्तनात ‘मी’ च्या अहंभावात मग्न आहोत,अहंकार सोडा ,असे विचार कथासम्राज्ञी साध्वीदेवकन्या सुगनाबाईसा (दीदी) यांनी श्रीमद् देवी भागवत संगीतमय कथेतनिरुपणाद्वारे मांडले.सागर पार्क येथे देवी भागवत कथा सुरु आहे. आज कथेचा आठवा दिवस होता.
जीवनात असे कार्य की लोकांना हेवा वाटेल
आज चाक्षुष मनु द्वारे देवीचे वर्णन आणि देवीचे भ्रामरी रूप धारण करणे आणि अरुण दैत्याचा उद्धार या विषयावर आज प्रवचन झाले. कथाकार दीदी सुगनादेवीसा मधुर वाणीद्वारे प्रवचनात पुढे म्हणाल्या जीवनात असे कार्य की लोकांना त्याचा हेवा वाटेल ,तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होऊन जाते. असे सांगून, एखाद्या कपड्याचा रंग जसा कायम स्वरूपी टिकून राहतो तसे प्रेम करा. नम्रता हा गुण अमुल्य दागिना आहे. चूक कबूल करण्याची आपल्यात क्षमता असावी. जीवनात प्रामाणिक रहा, त्याचे फळ मिळत असते. काल सायंकाळी आरती जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, योगेश्वर गर्गे, आनंद जोशी, घनश्याम अडवाणी, सुलभा लढ्ढा आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली.
सोरटी सेवा समितीचे अध्यक्ष व जळगावचे आमदार राजूमामा भोळे, स्वागताध्यक्ष महापौर नितीन लढ्ढा तर कार्याध्यक्ष राजू बांगर हे आहेत. तरसचिव राजेश यावलकर, रामदयाल सोनी आहेत. सातव्या दिवशी दैनिक यजमान म्हणून घनश्याम सोनी होते. तर प्रसाद यजमानस्वरूप लुंकड हे होते. सायंकाळची आरती. आदी मान्यवरांच्या हस्ते झाली. प्रमुख यजमान आमदार सुरेश भोळे व नगरसेविका सिमा भोळे ह्या आहेत. कथाकार सुगनादेवीसा हनुमानाच्या पूजेचे महत्त्व सांगतांना म्हणाल्या, हनुमान चालीसा वाचल्याने शनीची दृष्टी आपल्यावर पडत नाही. शनिवार, मंगळवार,अमावास्येला गुळ आणि चणे याचा नैवेद्य दाखवला तर हनुमान प्रसन्न होतो. त्या म्हणाल्या.