भुसावळातील हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
भुसावळ- जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात गुरूवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भुसावळातील हिंदुत्ववादी संटघनांतर्फे प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
तेढ निर्माण करणार्यांवर गुन्हा दाखल करावा
संविधान बचाओ, देश बचावो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभियानांतर्गत बैठक झाल्यावर फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार उषा दराडे यांच्यासह काही जणांनी हिंदू धर्माचा धार्मीक ग्रंथ असलेला मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून हिंदू धार्मीक भावना दुखावल्या असून शासनाने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करावा, दोन समाजात तेढ निर्माण करणांना कडक शासन करावे, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनेतर्फे शुक्रवारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. मनुस्मृती ग्रंथाच्या दहनप्रसंगी फौजीया खान, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, सुरेखा ठाकरे, सोन वसेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील आदींची उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
प्रांताताधिकार्यांना निवेदन देतेसमयी हिंदुत्ववादी संघटना, शहर शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्यांसह शिवसेनेचे उमाकांत (नमा) शर्मा, नगरसेवक मुकेश गुंजाळ, मोनू कापडे, शिवाजी दाभट तसेच गो-सेवक परीवारातील सदस्य उपस्थित होते.