मनोहर आंधळे, राजाराम उगले व प्रमोद राठोड यांचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने गौरव

0

स्वराज्य शिक्षक संघ, बारामतीचा उपक्रम ; पुरस्कारार्थींवर शुभेच्छांचा वर्षाव

चाळीसगाव- स्वराज्य शिक्षक संघ बारामती तर्फे नुकताच राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. त्यात महाराष्ट्रातील एकूण 126 प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि अधीक्षकांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. या सोहळयास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. सदर पुरस्कार सोहळयात सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगांव संचलित उच्च माध्यमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य आर.वी.उगले, माध्यमिक आश्रमशाळा करगांवचे उपशिक्षक कवी मनोहर नामदेव आंधळे आणि वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळेचे विद्यार्थी-अधीक्षक प्रमोद नगराम राठोड या तिनही कर्मचार्‍यांना अजित पवार, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि स्वराज्य शिक्षक संघ, बारामतीचे अध्यक्ष फतेसिंह पवार, राज्य उपाध्यक्ष प्रा.प्रवीण वाबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांकडून आदर्श भारतीय नागरिकांची पिढी घडावी व शिक्षकांप्रती गतकाळात जो आदर व सन्मान होता तो परत एकदा त्यांनी मिळवावा हीच अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.