नवी दिल्ली – राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आता भाजपा नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लक्ष केले आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल खरेदी कराराबाबत सर्व माहिती आहे. त्यांच्या खोलीमध्ये या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे आहेत. राफेलसंदर्भातील सर्व फाईल्स समोर आणल्या जाव्यात. राफेलसंदर्भातील रहस्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.